प्रिय दिव्य आत्मन,
कोव्हिड -19 साथीच्या रोगाच्या दुसऱ्या लाटेने भारताला अभूतपूर्व अशा संकटाने ग्रासले आहे. वैद्यकीय सुविधांची कमतरता, उपकरणे, औषधांच्या पुरवठ्याचा तुटवडा आणि तातडीच्या व ज्यांचा अभाव अनेकदा जीवनाला घातक ठरू शकेल, अशा सामुग्रीची गरज असताना वैद्यकीय मदत पुरवण्याबाबतची असमर्थता, अशा मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी देश झगडतो आहे. प्रिय व्यक्तीला गमावणे, मिळकतीचे नुकसान, आणि प्रत्येकाची सुरक्षितता व आरोग्य याबाबतची अनिश्चितता अशा प्रकारच्या कोव्हिड -19 च्या आघातांच्या प्रत्यक्ष अनुभवातून बचावलेले जीव फार कमी आहेत. ज्या कोणालाही अशी हानी सोसावी लागली असेल, त्यांच्यासाठी आमची अंत:करणे विव्हळतात आणि आम्ही त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करीत आहोत की, जगन्मातेच्या सर्वांगीण सांत्वनात्मक प्रेमाने त्यांना वेढून टाकावे.
जे लोक संकटग्रस्त आहेत – विशेषतः जे अभागी आहेत, आणि जास्त असुरक्षित आहेत – त्यांना साधनांची मदत आणि सेवा यांचा पुरवठा करून ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांमध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया सामील झाली आहे. एकूण 20 राज्यांमधील 25 पेक्षा जास्त शहरांमध्ये ह्या मदतकार्याची व्याप्ती क्रमाक्रमाने वाढतेच आहे आणि दररोज आणखी शहरे त्यात जोडली जात आहेत.
आपल्या देशांत ह्या कठीण प्रसंगी मदतीसाठी चालू असलेल्या आपल्या प्रयत्नांत, आपण सध्या काय हाती घेतले आहे आणि आपल्याला काय करता येईल, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवीत आहोत.
साहित्याची मदत आणि सेवाकार्य
आम्ही आपले आश्रम, केंद्र व मंडळे यांचा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी मध्यवर्ती केंद्रें म्हणून उपयोग करीत आहोत. हे प्रयत्न गरजू व्यक्ती व कुटुंबांपर्यंत थेट पोहोचत आहेत, ह्याशिवाय, आम्ही कोव्हिड-19 च्या रुग्णांचा उपचार व आरोग्याची काळजी घेणाऱ्या रुग्णालयांना आणि बिगर सरकारी संस्थांना (एन जी ओ) मदत करीत आहोत. यो.स.सो.च्या प्रयत्नात हे समाविष्ट आहे:
- आम्ही तीव्र तुटवडा भासत असणाऱ्या रुग्णालयांना अतिरिक्त बिछाने, स्ट्रेचर्स, व्हीलचेअर्स आणि जीवनरक्षक औषधे व उपकरणे जसे बाय पॅप मशीन्स, नॉन-इनव्हेसिव्ह व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स पुरवीत आहोत. ह्यांत रांची, कोयंबत्तूर, हरिद्वार, मदुराई, मुंबई, नागपूर, सेरामपूर, वेल्लोर, आणि विजयवाडा येथील रुग्णालयांचा समावेश आहे.
- आम्ही आघाडीवरील वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक, जे थेट कोव्हिड-19 च्या रुग्णांची सेवा करीत आहेत, त्यांना औषधे, पल्स ऑक्सिमीटर्स, पीपीई किट्स, फेस शिल्ड्स, मेडिकल ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर्स, एन 95 मास्क, आणि थर्मामीटर्स अशी आवश्यक सामुग्री पुरवीत आहोत. ही मदत आम्ही दक्षिणेश्वर, द्वाराहाट, आर्सीकेरे, बेल्लारी, बेंगलूरू, चंदिगढ, चेन्नई, कोयंबत्तूर, लखनऊ, मंगलूरू, मैसूर, रायपूर, आणि तंजावूर या ठिकाणी पोहोचवीत आहोत.
- द्वाराहाट येथील छोट्या स्थानिक रुग्णालयांत प्रगत वैद्यकीय तपासणीची गरज असणाऱ्या रुग्णांना हल्दवानी येथील जवळच्या मोठ्या वैद्यकीय रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही रुग्णवाहिकेची उपकरणे बसवता येतील अशी आवश्यक ती व्हॅन खरेदी केली.
- सरकारी रुग्णालयांना आवश्यक सामुग्री पुरवली आहे, जसे उडुपी येथे हॉट वॉटर डिस्पेन्सर्स व चेन्नई येथे कॅडव्हर बॅग्स.
- आपले रांची आश्रम रुग्णालय आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग चोवीस तास रुग्णवाहिका सेवा, शववाहिनी सेवा, ऑक्सिजन सिलिंडर, मेडिकल किट, नि:शुल्क चिकित्सा सल्ला पुरवीत आहेत.
- आम्ही आय सी यू मधील गरजू रुग्णांना खर्च भागविण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविले आहे आणि काहींच्या बाबतीत जेथे मृत व्यक्तीच्या एकट्याच्या मिळकतीवर घरखर्च अवलंबून होता, त्याच्या जवळच्या नातेवाईकाला आर्थिक सहाय्य दिले आहे.
- ज्या लोकांनी लॉक डाऊन मुळे उपजीविकेचे साधन गमावले आहे, त्यांना कोरडे धान्य पुरविण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. रांची, द्वाराहाट, दिल्ली आणि एन सी आर, अहमदाबाद, बेल्लारी, बेंगलूरू, बेळगांव, हरिद्वार, हसन, कैगा-कारवार, मंड्या, मुझफ्फरपूर, ओंगोल, राजमंड्री, आणि थिरुकाझुकुंद्राम ह्या ठिकाणी हे कार्य सुरू आहे.
आमच्या कोव्हिड-19 च्या मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी आणि गरजू लोकांना निवडण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या मित्रांचे व यो.स.सो.च्या साधकांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. आम्ही त्यांची नि:स्वार्थ सेवेची भावना ओळखतो, जी आपल्या प्रिय गुरुदेवांनी आपल्याला दिलेल्या यो.स.सो.ची उद्दिष्ट्ये व आदर्शांपैकी एक दर्शविते: “आपल्याच विशाल आत्म्याच्या स्वरूपात मानवजातीची सेवा करणे”.
मदत पुरविणाऱ्या आमच्या दोन साधक स्वयंसेवकांनी पुढील संदेश सामायिक केले आहेत:
“पीडितांना आणि शुश्रूषा करणाऱ्यांना मदत करून ‘आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी जाणीव करून देणे अतिशय समाधानकारक आहे.”
— के.बी. राजमंड्री
“बायपॅप ह्या जीवनरक्षक यंत्राची आत्यंतिक गरज असणाऱ्या शासकीय रुग्णालयाला आम्ही मदतीचा हात देऊ शकलो, ह्यासाठी मी आभारी आहे. परिणामकारकरित्या आपल्या गुरूंचे कार्य करणारे हात होणे हा खरोखर आशीर्वाद आहे!”
— आर. आर. नागपूर
तुमची मदत महत्वाची आहे. कोव्हिड निवारणाची गरज संपलेली नाही. लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे. आपले प्रयत्न चालू ठेवण्यासाठी, आम्ही कोव्हिड- 19 मदतकार्याला देणगी देऊ शकणाऱ्यांना आवाहन करीत आहोत. तुमच्या अंतःकरणपूर्वक, सढळ मदतीने आम्हाला सेवा देणे शक्य होईल. त्याशिवाय आणि अगदी महत्वाचे, आम्ही तुम्हाला गरजवंतांसाठी प्रार्थना करण्यास प्रोत्साहित करतो. गुरुदेवांनी आपल्याला प्रार्थना करण्याची योग्य पद्धत शिकविली, आणि प्रार्थना परिणामकारक असते हे शिकविले. ह्या अत्यधिक गरजेच्या वेळी यो.स.सो.चे संन्यासी प्रार्थना करतात, ज्यात रोज रात्री 9:40 ते 10:00, (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ऑनलाईन रोगनिवारक विशेष प्रार्थनेचा समावेश आहे. जर कधी शक्य झाले तर कृपया त्यात सहभागी व्हा.
आपले गुरुदेव श्री श्री परमहंस योगानंदजी म्हणतात, “दररोज स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी जसा प्रयत्न करता, तसाच तुमच्या सभोवताली शारीरिक, मानसिक, वा आध्यात्मिक रित्या अस्वस्थ असणाऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा. मग जीवनाच्या रंगमंचावर तुमची भूमिका कोणतीही असली, तरी तुम्हांस कळून येईल की सगळ्यांचे विधिलिखित ठरविणाऱ्या रंगमंच व्यवस्थापकाच्या निर्देशनानुसार तुम्ही ती योग्य तऱ्हेने पार पाडली आहे.”
आपल्यासमोरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधार व मदत देताना आपण जे काही करू शकू त्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये आम्हाला सहकार्य द्यावे म्हणून आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो व तुमचे स्वागत करतो. परमेश्वर आणि गुरुजनांनी आपल्या अंतःकरणपूर्वक प्रार्थनांना आणि मानवतावादी मदत करण्याच्या प्रयत्नांना, त्यांच्या करुणामय आरोग्यदायी प्रकाशाने आणि दैवी प्रेमाने वेढले आहे.
दैवी मैत्रीसह,
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया
जर ह्या सेवाकार्यात योगदान देण्याची तुमची इच्छा असेल तर कृपया ऑनलाईन देणगीचा विचार करा.
कृपया लक्षांत घ्या की योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया ही आयकर कायदा, 1961 च्या तरतुदीनुसार एक मान्यताप्राप्त धर्मार्थ संस्था आहे. ह्या संस्थेला (PAN: AAATY0283H) दिलेल्या देणग्या भारतात सेक्शन 80-G च्या अंतर्गत आयकर वजा करण्यायोग्य आहेत.
जर तुम्हाला देणगी किंवा आमच्या मदत कार्याविषयी काही चौकशी करावयाची असेल तर, कृपया रांची हेल्प डेस्कशी, helpdesk@yssi.org ईमेल द्वारे किंवा टेलिफोन +91 (651) 6655 555 द्वारे संपर्क साधावा (सोमवार ते शनिवार सकाळी 9:00 पासून सायंकाळी 4:00 पर्यंत).
Media Coverage of Charitable Activities
Print Media
- Birsa Vani (Hindi)
- Dainik Bhaskar (Hindi)
- Desh Prana (Hindi)
- Freedom Fighter (Hindi)
- Jadeed Bharat (Urdu)
- Prabhat Khabar (Hindi)
- Punch (Hindi)
- Punjab Kesari (Hindi)
- Pioneer (English)
- Ranchi Express (Hindi)
- Sanmarg City (Hindi)
- Santal Express (Hindi)
- Janadesh (Daraunda, Hindi)
- Dainik Jagran (Haridwar, Hindi)